शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना अंतर्गत शेतीसाठी शेती कामासाठी विविध उपकरणे शंभर टक्के अनुदानावर देत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून शेतकरी प्रगतशील व्हावा यासाठी शेतकऱ्यांना आता शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप म्हणजेच बॅटरीवर चालणारे फवारणी पंप अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
कापूस सोयाबीन तसेच इतर तेलबिया पिकांवर होणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप महाराष्ट्र शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर देण्यात येत आहे.यासाठी सरकारने शेतकऱ्यांना चालु वर्षासाठी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे.
राज्यात पावसाचे प्रमाण उत्तम असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी असलेला घास शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कापूस सोयाबीन यांच्या जास्तीत जास्त प्रेरणा झालेले असल्यामुळे व हे पिके भारत असल्यामुळे पिकावर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मदत वाढ शासनाने दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर हा लाभ घेता येणार आहे.
फवारणी पंप साठी कुठे कराल अर्ज?
बॅटरी फवारणी पंप अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्या. किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वरून महाडीबीटी हे ॲप डाऊनलोड करून यावरूनही फॉर्म भरू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
- सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login यावर जा .
- त्यानंतर लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर अर्ज करा बाबीवर क्लिक करा .
- त्यानंतर कृषि यांत्रिकीकरण बाबी निवडा यावर क्लिक करा.
- त्यानंतर मुख्य घटक बाबीवर क्लिक करा.
- त्यानंतर कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर क्लिक करा.
- त्यानंतर तपशिल बाबीवर क्लिक करून – मनुष्यचलीत औजारे घटक निवडा.
- त्यानंतर यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करून – पिक संरक्षण औजारे निवडा.
- त्यानंतर मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून बॅटरी संचलीत फवारणी पंप ( गळीतधान्य)/कापूस निवड करा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा
- आठ अ उतारा
अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.